छत्रपती संभाजीनगर येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागांची जिल्हा प्रशिक्षण वर्ग योजना कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत उपस्थित राहून संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन ऐकण्याची व संवाद साधण्याची संधी मिळाली. अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांना नवी दिशा, ऊर्जा मिळत असून संघटन अधिक भक्कम होत आहे..
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण, ना.श्री.अतुलजी सावे, मा.प्रीतमताई मुंडे, माजी खासदार डॉ.भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष श्री.संजयजी कौडगे, मा.भारतीताई पवार, आमदार श्री.संजय केणेकर तसेच प्रदेश, विभाग व जिल्हा स्तरावरील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.