वसमत विधानसभा अंतर्गत गिरगाव सर्कल येथे लोकजागर अभियानाच्या अनुषंगाने संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

वसमत विधानसभा अंतर्गत गिरगाव सर्कल येथे लोकजागर अभियानाच्या अनुषंगाने संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

लोकजागर अभियान | भारतीय जनता पार्टी – वसमत विधानसभा | गिरगाव सर्कल
वसमत विधानसभा अंतर्गत गिरगाव सर्कल येथे लोकजागर अभियानाच्या अनुषंगाने संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
“शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत” हा उद्देश समोर ठेवत या अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला. अनेक नागरिक माहितीअभावी योजनांपासून वंचित राहतात; अशा लाभार्थ्यांना मुख्य प्रवाहाशी जोडून त्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावपातळीवर सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मतदार विशेष सखोल पुनर्रचना (SIR) अभियान, नवीन मतदार नोंदणी, मतदार याद्यांतील त्रुटी दुरुस्ती तसेच बूथ सक्षमीकरण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बूथ मजबूत असेल तरच संघटन अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचू शकते, या भावनेतून BLA-2 पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही विशेष भर देण्यात आला.
लोकजागर अभियानाच्या माध्यमातून केवळ संघटनात्मक बळकटी, जनतेमध्ये विश्वास, सहभाग आणि विकासाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे.
श्री.गुरुपारदेश्वर महाराज, जिल्हा सरचिटणीस श्री.खोब्राजी पाटील नरवाडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.विजयराव नरवाडे, डॉ.अवधूत शिंदे, श्री.विजय कडतन, श्री.गणेश कमळू, श्री.अमोल मुळे, श्री.मल्लिकार्जुन बुरपुटे, श्री.गजानन पप्पलवाड, डॉ.मारुती बुट्टे, श्री.प्रमोदजी नादरे, श्री.राजेश भालेराव, श्री.मदनराव नादरे, श्री.प्रभाकर वारसे, श्री.संदीप रणखांब, श्री.दिलीपराव, श्री.रामचंद्र बागल, श्री.राजू पाटील, श्री.जगन वारे, श्री.संतोष बुरपुटे, श्री.नारायण जाधव, श्री.गजानन वारे, श्री.चंदू कऱ्हाळे, श्री.रोहिदास नादरे, श्री.संदीप दळवी, श्री.बालाजी शिंदे, श्री.पुंडलिक दाळपुसे, श्री.बालाजी कऱ्हाळे, श्री.गंगाप्रसाद रायवाडे, श्री.संतोष नरवडे, श्री.केशव परकटे, श्री.नागेश नादरे, श्री.प्रकाश दळवी, श्री.उद्धव वारे, श्री.मदन चंदेवार, श्री.विनोद नादरे, श्री.गणेश व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.