पंडित दीनदयाल उपाध्याय दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान शिबिर उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

पंडित दीनदयाल उपाध्याय दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान शिबिर उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

पंडित दीनदयाल उपाध्याय दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान शिबिर शांती हॉटेल, हिंगोली येथे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या महाअभियानात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर प्रशिक्षणात्मक सत्रे आयोजित करण्यात आली. त्यामध्ये वैचारिक अधिष्ठान, पार्टीचा इतिहास आणि विकास, आमची कार्यपद्धती, विचार परिवार यांसह कार्यकर्ता विकास, सांभाळ आणि दायित्व बोध या विषयांवर सखोल मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपले संपुर्ण योगदान देऊन पक्षाचे कार्य कसे वाढवावे याचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच मोदी सरकारचे गरीब कल्याणाचे उपक्रम, सोशल मीडिया आणि AI, नमो ॲप, सरल ॲप, मीडिया व्यवस्थापन आणि व्यावहारिक सत्र यांद्वारे कार्यकर्त्यांना आधुनिक काळातील कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले व जनतेला याच्या माध्यमातून कसे लाभ मिळवून द्यावे याची संपूर्ण माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण महाअभियानाद्वारे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा व कार्यकर्त्यांना सक्षम बनविण्याचा निर्धार केला आहे.